साखरेच्या पोत्यांचा ट्रक पलटी, दोन अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन विचित्र अपघात झाले. या अपघातांत दोघांचा मृत्यू

0

पुणे : ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर दोन विचित्र अपघात झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. या अपघातांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘अमृतांजन’ पुलाखाली मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच ठार झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसजवळील फूड मॉलजवळ एक अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला. हे दोन्ही अपघात खोपोली हद्दीत झाला आहे. त्यानंतर आयआरबी यत्रंणा, वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचली. त्यानंतर वाहतूक यंत्रणेकडून तातडीनं पावले उचलण्यात आल्याने सद्यस्थितीत हा मार्ग सुरळीत सुरू करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.