कांचन नाईक जांबोटी यांच्या लढ्याला यश, शिवाजी पार्कच नाव बदल

सकल ओबीसी समाजाचे 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'साठी आंदोलन

0

हाराष्ट्राची ओळख ही संतांची व वीरांची भूमी म्हणून संपूर्ण भारतासह विदेशात याचा उल्लेख आहे. महापुरुष व संतांच्या वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातील अनेक ऐतहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या ‘मैदान शिवाजी पार्क’ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशासह संपूर्ण जगाला ज्ञात आहे. विदेशात ‘ह्युसटन’ विद्यापीठात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ या युद्धनीतीवर 100 गुणांचा पेपर घेतला जातो. ‘शिवाजी पार्क’ या मैदानावर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु  ज्या जाणता राजाने आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजवल्या. त्यांच्या नावाचा  होणारा  एकेरी उल्लेख सकल ओबीसी समाजाच्या अध्यक्षा कांचन नाईक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मनात खुपत होता.

shivaji Park
महापुरूषांच्या विचारासाठी लढत असताना कांचन नाईक जांबोटी संस्थापिका अध्यक्षा यांच्यावर गुन्हे दाखल झाले. अनेकवेळा महापुरुषाच्या विचारासाठी एकत्र येऊ नये म्हणून नोटीस देण्यात आली. पण, कोणतेही  महापुरुष हे कधीच एकाच जातीचे बांधिल नसतात. आज सकल ओबीसी समाज व महाराष्ट्राची खरी रणरागिणी कांचन नाईक जांबोटी यांचा कोणताही स्वार्थ नसताना फक्त महापुरुषाचा एकेरी उल्लेख होऊ नये म्हणून लढा देत होते. मात्र तो इतर कोणालाही तो दिसत नव्हता. पण ते कांचन नाईक जांबोटी यांच्या मनात आणि डोळ्यात एकेरी उल्लेख  सलत होता. त्यामुळे त्यांच्यावर अनेकवेळा गुन्हेही दाखल झाले. आज ‘मुंबई महानगरपालिका शिवाजी पार्क’ यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’, अशा नावाचा बोर्ड लावत आहे. पण कांचन नाईक जांबोटी यांनी दिनांक 19 मार्च 2019 रोजी नामकरण करू नये म्हणून त्यांना व त्याचा सहकार्यांना अडवले होते पण तरीही या वाघिणीने मराठी नववर्षाचे निमित्त 6 एप्रिल 2019 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’, असे नामकरण करत सगळा पार्क हादरून सोडला होता. आज जातीसाठी, सत्तेसाठी वापर करणाऱ्यांकरिता कांचन नाईक जांबोटी यांनी खूप मोठा आदर्श दिला. कोणत्याही महापुरुषांचा एकेरी उल्लेख नये. महाराष्ट्राच्या पुरोगामीला ठेच लागण्यापासून वाचवले. हेच जर आज कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय वारसा असलेले, आमदार, खासदार असते तर त्यांचा महाराष्ट्रामध्ये उदो उदो झाला असता. पण कांचन नाईक जांबोटी यांनी इतका मोठा लढा उभारला; पण या सर्वांपासून वंचित राहून श्रेयवाद घेत नाहीत, यांचा सार्थ अभिमान आहे. महिला असून आज इतके मोठे कार्य केले, ज्याची इतिहासामध्ये नोंद झाली. आज 72 वर्षांनंतर न्याय मिळाला, पण लढा अर्धवट नाही तर कांचन नाईक जांबोटी यांनी मागील पिढीचा लढा हा नि:स्वार्थपणे लढला. त्याचे यश आज त्यांना मिळाले आहे.
प्रत्यक्षात मात्र महाराजांचे नाव सोयीनुसार हवे तसे वापरले जाते ते बंद व्हायलाच पाहिजे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वार्थी प्रशासन, सरकार कधी याबद्दल कांचन नाईक जांबोटी यांची महिला म्हणून दखल घेणार नाही. पण आपणा सर्वांकडून कांचन नाईक जांबोटी यांच्या कार्याचा गौरव आणि अभिनंदन! महाराष्ट्रातील प्रत्येकाने मागणी करून त्यांना ‘महाराष्ट्र पुरस्कारा’ ने सन्मानीत करावे, अशी मागणी करण्यात यावी. महाराष्ट्रामधील प्रत्येकापर्यंत कांचन नाईक जांबोटी यांचा हा लढा पोहोचला पाहिजे. इतिहासामध्ये चुकीची नावे येऊ नयेत.
(सगळ्यांना पुरावे लागतात सोबत छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी केलेले आंदोलन, पोलिस प्रशासनाने दिलेले प्रमाण पत्र )

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.