रांजणगावातील शिवाजी विद्यालयाला उपशिक्षण अधिका-यासह पथकाची भेट

0

औरंगाबाद : रांजणगाव येथील शिवाजी विद्यालयातील दोन विद्यार्थी बस मधून पडून जखमी झाल्याची घटना सोमवारी शहरातील लोखंडी पुल ते  नगरनाक्या दरम्यान घडल्यानंतर शिवाजी विद्यालयच्या अजब कारभाराची उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभागप्रमुख प्रिया राणी पाटिल आणि पथकाने शाळेची पाहणी केली. मात्र या घटनेनंतर मंगळवारी शाळेत शुकशुकाट होता. शाळेत ना विद्यार्थी आले ना शिक्षक. त्यामुळे पथकाला या शाळेतील संबधितांकडून माहिती घेऊन वरिष्ठाकडे पाठवावी लागणार आहे. यावेळी पथकाने पालकांना विचारपूस करून शाळेबद्दल जाणून घेतले.

शिवाजी विद्यालयची एक शाळा खोकड़पुरा येथे तर दूसरी शाळा शिवाजी विद्यालय नावाने रांजणगांव शे. पु. येथे आहे. रांजणगांव येथील पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी हे खोकडपुरा शाळेतील हजेरी पटलावर येतात. या विद्यार्थ्यांना रांजणगाव साईनगर भागात असणाऱ्या शाळेतच शिक्षणाचे धडे दिले जातात. विद्यार्थी शहरात जाऊ शकत नसल्याने शाळेने हा निर्णय घेतल्याचे माहितीत समोर आले. सोमवार गोवर -रूबेला लसीकरण खोकडपूरा शाळेत होते. त्यामुळे रांजणगांव येथील शिवाजी हायस्कूलच्या १२२ विद्यार्थ्यांना खोकडपूरा येथे नेण्यात आले होते. लसीकरणानंतर रांजणागावकडे निघालेल्या बसमधील दोन विद्यार्थी बसची काच अचानक निखळल्याने धावत्या बस मधून पडले आणि गंभीर जखमी झाले. ही घटना लोखंडी पुल ते नगर नाकावर घडली. प्रत्यक्षदर्शींनी विद्यार्थ्यांना तातडीने उचलून रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची दखल घेऊन शिवाजी हायस्कूलला उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभागप्रमुख प्रिया
राणी पाटिल यांच्यासह गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षण विस्ताराधिकारी अनिल सकदेव, जी. प. जालन चौरे, एम. आर. सोनवणे, सीताराम पवार, केंद्रप्रमुख देवीदास
सूर्यवंशी यांनी दिली आणि शाळेची चौकशी केली. तसेच पथकाने पालकांशी चर्चा करुन शाळेबद्दल जाणून घेतले आहे. यावेळी मुख्याध्यापक रजेवर असल्याचे सांगत पूर्ण माहिती आल्यानंतर वरिष्ठाकडे पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.