वीजबिल वसुली थांबवा; मनसेचा महावितरणला इशारा

वीजबिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट, असे जर घडले तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ

0

करमाळा  : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे.

करमाळा तालुक्यातील वीजग्राहकांना महावितरण कंपनीने वीजबिल भरण्यासाठी बळजबरी करू नये, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे. करमाळा व तालुक्यात सध्या अर्थिक मंदिचे सावट असून मार्च 2020 कोरोना रोगाच्या संसर्गामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊनमध्ये उद्योग धंदे बंद होते. आत्ता कुठे जनजीवन सुरुळीत होत असताना  महावितरण कंपनीने सर्व ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. वीजबिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करण्यात येईल, असे जर घडले तर मनसे शांत बसणार नाही व मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा निवेदनाद्वारे मनसे विद्यार्थी सेना सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख विजय रोकडे यांनी दिला. यावेळी मनसे विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश फंड जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे मनसे तालुका अध्यक्ष संजय बापु घोलप शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, रोहित फुटाणे सचिन कनसे आप्पासाहेब निकम उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.