माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला

सरकार आणि प्रशासनाचे सूचनांचे पालन, त्यांना सहकार्य करणे आवश्यक

0

मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देश सध्या संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या सकंटाचा काळ आहे, त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा. आपापल्या समाजाला दिशा देण्याचं काम प्रत्येकाने नागरिक म्हणून करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पुन्हा लॉकडाऊन वाढवला. लॉकडाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले. काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी  सांगितले की, एकांतात बसणे हीच राष्ट्रसेवा असल्याचे ते म्हणाले. सरकार आणि प्रशासनाचे सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर समाजाने उतावळे होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

माथी भडकावणाऱ्यांपासून दूरू राहा

भय क्रोधापासून दूर राहणे, आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले. कारण, घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते. तर, क्रोधाने तुमचे स्वास्थ बिघडेल. त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला भागवत यांनी दिला आहे. प्रत्येक समाजाच्या समजूतदार लोकांनी पुढे येऊन आपापल्या समाजाला दिशा देण्याचे करायला हवे. या काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करुन गर्दी करू नये. संघाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या संकटाकाळात जे सेवा करत आहेत. त्यांनी ही सेवा निःस्वार्थ भावाने करायला हवी. उपकाराच्या भावनेने कधी सेवाभाव होत नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.