‘महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत’च्या वतीने ग्रामविकास राज्यमंत्र्यांना निवेदन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी

0

औरंगाबाद  : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  राज्यातील जवळपास सात हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. किमान वेतनासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची माागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास सात हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. किमान वेतनासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची माागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. नगरपरिषद किंवा जि.प.याप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यात यावे,  वेतन अदा करताना कर वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शासनाकडून वेतन अदा करण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर युनियनचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष दयानंद येरडे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष एकनाथ कीर्तिकर, लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे ,अमोल गायकवाड , त्रिमूर्ती नवगिरे, गणेश भालेराव,शिवाजी बागल पाटील, एकनाथ साेनवणे, काकासाहेब कराळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.