औरंगाबाद युवा वारकरी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देवी-देवता आणि महापुरुषांची नावे : मांसाहारी व बिअरबार हॉटेल्सची नावे बदलण्याची मागणी
करमाड : महाराष्ट्रात देवी- देवतांची आणि महापुरुषांच्या नावाने सर्वत्र व्यावसायिकांनी सुरू केलेली मांसाहारी हॉटेल बिअर बार यांची नावे त्वरित बदलण्यात यावे, असे आदेश जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मांसाहारी केंद्रांना काढावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद युवा वारकरी महामंडळाच्या वतीने देण्यात आले.
सर्व हॉटेल व इतर देवी देवतांच्या नावाने नको ते व्यवसाय सुरू केलेल्यांंनी नावे बदलावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अध्यक्ष हभप भागवताचार्य निवृत्ती महाराज वाडेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील हॉटेल व बिअरबार मालकांना केले. त्या ते म्हटले की, ज्या संतांनी व महापुरुषांनी समाजाला निर्व्यसनी व मांसाहार न करण्याचा संदेश संपूर्ण जगाला दिलेला असताना त्या महापुरुषांच्या नावाने जर असे मांसाहारी व बिअर बार हॉटेल सुरू राहिले तर समाजाने त्यांचा आदर्श काय घ्यावा? नाशिक जिल्ह्यातील दाभाडी या गावातील हरिओम बिर्याणी शॉप या नावाने सुरू असलेल्या हॉटेल मालकाला मी त्वरित त्यांना फोन करून नावांमध्ये बदल करण्याची मागणी केली असता, त्यांनी हॉटेलच्या नावामध्ये त्वरित बदल करू, असे सांगितले. तसेच संपूर्ण वारकरी एकत्रित आले तर महापुरुषांच्या व संतांच्या व देव-देवतांच्या नावाने सुरू असलेली मांसाहारी हॉटेल व बिअर बार त्यांच्या नावामध्ये नक्कीच बदल होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वारकरी वारकरी महामंडळ कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री, मराठवाडा विभाग अध्यक्ष ह-भ-प महादेव महाराज बोराडे शास्त्री,वारकरी महामंडळ राज्य अध्यक्ष आर के रांजणे, युवा वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. श्रीराम महाराज रगड,युवा वारकरी महामंडळ कार्याध्यक्ष किशोर महाराज शिवणीकर यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष युवा वारकरी महामंडळ निवृत्ती महाराज वाडेकर, शहराध्यक्ष यु.वा.महामंडळ सुनील महाराज अधाणे, संतोष महाराज सोळंके, ओम प्रकाश महाराज कांगणे आदी वारकरी उपस्थित होते.