‘राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने लावली पेशंटची वाट’

'मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचे बक्षीस देऊ' -संदीप देशपांडे

0

मुंबई : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. रविवारी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते रेल्वे सुरू करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पण यातले काहीच कळले नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.

लोकल सुरू करण्याचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. यासाठी वारंवार ठाकरे सरकारवर निशाणा साधत  आहे.  रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणालाही मनसेकडून लक्ष्य करण्यात आले. ‘राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात, 21 ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात, नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही’ अशी टीका  संदीप देशपांडे यांनी केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना गर्दी नको असेल तर त्यांनी घरातच थांबावे. मात्र, सर्वसामान्य जनतेला कामावर जायचे आहे. बँकेचे हफ्ते भरायचे आहेत. याकडे लक्ष कोण देणार? असा थेट सवाल संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर याआधीही संदीप देशपांडे यांनी घणाघाती टीका केली. ‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरू करत आहात. एक-एक आस्थापना सुरू करत आहे, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसे जायचे? त्या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही’ असे संदीप देशपांडे यांनी म्हणाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.