पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू; ‘लालपरी’ अद्यापही प्रवाशांच्या प्रतीक्षेत

दसरा-दिवाळीत वाढू शकतात, प्रवासी फक्‍त 40  टक्के प्रवासी

0
औरंगाबाद : कोरोनामुळे पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस सुरू करण्यात आली होती. शासन निर्देशानुसार पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. 9 ते 10 दिवसात प्रवासी संख्या वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र 20 दिवसांचा कालावधी लोटूनही प्रवासी भारमान आणि उत्पन्न दोन्ही अतिशय अल्प आहे. तसेच एसटी महामंडळाची अलिशान बससेवा ‘शिवनेरीला’देखील अल्प प्रतिसादामुळे 15 दिवसांमध्येच बस्तान गुंडाळण्याची वेळ आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिने शंभर टक्के बंद असलेली बससेवा सामाजिक अंतर राखून 20 ऑगस्टपासून 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरू केली होती. त्यामुळे एका बसमधून 22 प्रवाशांचीच वाहतूक केली जात होती. शासनाने आदेश काढून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्यास मंजूरी दिली.पूर्वीसारखी प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी आता लवकरच दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अजूनही एसटी सेवा पूर्ववत झालेली नाही. कोरोनानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला बराच मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु करुनही उत्पन्नावर विशेष फरक पडलेला नाही. प्रवास करण्यासाठी कारणेच नसल्यामुळे बस रिराम्याच  आहेत. कोरोनामुळे लग्न  समारंभावर मर्यादा आहेत. थोडक्यात आटोपण्यावर नागरिकांचा कल आहे. त्यामुळे लग्नासाठी जाणार्‍या प्रवाशांची संख्याच नाही. मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद असल्यामुळे देखील प्रवासी संख्या अतिशय अल्प आहे. मुंबई – पुणे, औरंगाबाद – पुणे या मार्गांवर धावणारी शिवनेरी बससेवा देखील अल्प प्रतिसादामुळे पंधराच दिवसांत बंद करण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी सांगितले.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.