गडचिरोलीत एसआरपीएफचे जवान दीपक लक्ष्मण गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन
जवान दीपक गायकवाड यांचे देशसेवा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन
गडचिरोली : नवापूर तालुक्यातील मोग्रणी गावात राहणारे शहीद दीपक लक्ष्मण गायकवाड (कोकणी) वय 32 यांचे मंगळवारी गडचिरोलीत देशाची सेवा बजावत असताना सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दीपक गायकवाड एसआरपीएफ दलामधील जवान म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने एसआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दीपक गायकवाड (कोकणी) यांचे लहान बंधू मणिलाल गायकवाड यांना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास फोन करून तुमच्या भावाचा हृदयविकाराने निधन झाल्याचे कळविले. घटनेची माहिती मिळताच, घरातील नातेवाईकांनी आक्रोश केला. संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शोकाकुल वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच स्व. दिपक गायकवाड यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने मोग्रणी येथे धाव घेतली. तसेच दिवस भरात सोशल मीडिया वर स्व. दीपक गायकवाड (कोकणी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी सकाळी गडचिरोलीहून नंदुरबार येथे दीपक यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा मूळगावी मोग्रणी येथे नेणार आहे. दीपक लक्ष्मण गायकवाड (कोकणी) यांचा जन्म नवापूर तालुक्यातील मोग्रणी यागावी 30 डिसेंबर 1989 ला जन्म झाला. त्यांचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण शासकीय माध्यमिक आश्रम शाळा नावली येथे झाले. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी पाचवीत नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा नंबर नवापूर तालुक्यातील आदर्श शासकीय आश्रम शाळा देवमोगरा येथे लागला.
पाचवी ते दहावीपर्यंत देव मोगरा आदर्श विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण अग्रीकल्चर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा येथे पूर्ण केले. त्यानंतर नंदुरबार येथे फायर इंजिनिअरिंग चा कोर्स करण्यासाठी गेले त्यानंतर ते 2013-2014 साली एसआरपीएफ दलात भरती झाले. पहिली नेमणूक पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झाली. त्यानंतर कोल्हापूर-मुंबई गडचिरोली असे अनेक भागात त्यांनी देशासाठी सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार नवापूर तालुक्यातील मोग्रणी येथे राहत्या घरी करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.