‘अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स’ शाळेत ऑनलाइन अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
काेराेनापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन
आसेगाव : येथील अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेतील ऑनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने मुलांना शिक्षण देण्याचे कार्य दरराेज वेगवेगळा अभ्यास करून घेत आहे.
काेराेनापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करत सध्या ऑनलाइन पध्दतीने मुलांना शिक्षण देण्याचे कार्य शाळा करत आहे. आसेगाव येथील ‘अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स’ या शाळेचे शैक्षणिक वर्ष 2020-2021 शासनाच्या सुचनेप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. वर्ग तिसरी ते सातवी स्टेट बोर्ड व तिसरी ते चौथी सीबीएसई पॅटर्नसाठी प्रत्येक दिवशी 1 ते दीड तास सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्याचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी घरी असल्याने त्यांचे बौद्धीक आणि शारीरिक स्तर उंचविण्यासाठी वरच्या वर्गातील मुलांसाठी ऑनलाईन स्पोर्ट अॅक्टीविटी योगासन शैक्षणिक अभ्यासक्रम, कविता, टेबल्स स्टोरी, जनरल नॉलेज हे सर्व उपक्रम राबवत आहे. यासाठी या शाळेतील शिक्षकवृंद चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गद्र्शन करत असल्याचे शाळेचे सचिव सुवर्णजित शंकर पल्हाळ यांनी सांगितले. तर विद्यार्थी व पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.