करमाड पोलिस ठाण्यात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जातीय सलोखा अभियानअंतर्गत रक्तदान शिबिर
करमाड : करमाड पोलिस ठाण्याच्या वतीने जातीय सलोखा राखण्यासाठी त्या हद्दीतील विविध ठिकाणी बैठका व कार्यक्रम घेत असताना पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथून जनसंपर्क अधिकारी यांचा फोन आला की, घाटी रुग्णालयात रक्ताचा अतिशय तुटवडा आहे. जातीय सलोखा अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर घेऊन हद्दीतील नागरिक यांना चांगला संदेश देऊन शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घाटी रुग्णालय यांच्या मदतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
करमाड पोलिस ठाण्याच्या वतीने जातीय सलोखा राखण्याकरिता त्या हद्दीतील विविध ठिकाणी बैठका व कार्यक्रम घेत असताना पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथून जनसंपर्क अधिकारी यांचा फोन आला की, घाटी रुग्णालयात रक्ताचा अतिशय तुटवडा आहे. जातीय सलोखा अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर घेऊन हद्दीतील नागरिक यांना चांगला संदेश देऊन शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत यावेळेत घाटी रुग्णालय यांच्या मदतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास पोलिस ठाणे करमाड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह हद्दीतील नागरिक, शहापूरजी पालमजी कंपनीतील अधिकारी व कर्मचारी तसेच औरंगाबाद येथील फायनान्स कंपनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात लॉकडाऊन नंतरचे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक रक्तदान रक्तदात्यानी केल्याचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी सांगितले. पोलिस ठाणे करमाड येथील रक्तदान शिबिर हे पोलिस अधीक्षक औरंगाबाद मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडले. सदर रक्तदान शिबिरास डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, सपोनि प्रशांत पाटील, पोउपनी राजू नांगलोत, गणेश जागडे, सुशांत सुतळे यांच्यासह करमाड पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, पंचक्रोशीतील रक्तदाते उपस्थित होते.