पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन

0

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गणेश उत्सवात सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा न करता जमा केलेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवावे, असे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून विविध गावांतील 39 मंडळांनी प्रतिष्ठापना न करण्याचे लेखी स्वरूपात दिले आहे.

कोरोनाने सर्वजण त्रस्त आहे. याच पार्श्‍वभूमीवर काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सार्वजनिक मंडळांना आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हयातील विविध 39 गावांतून सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार नसल्याचे लेखी स्वरूपात संबंधित ठाण्यात दिले आहे. यामध्ये कन्नड, हातनूर, नागद, चापानेर आदी गावांचा समावेश आहे. तर अनेक मंडळे जमा झालेल्या वर्गणीतून मास्क आणि सॅनिटायझर वाटप करणार आहेत. गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात आवश्यक साहित्य देणार आहे. इतरही सार्वजनिक मंडळांनी याचप्रकारे गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता घरात साधारण पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापणा करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.