भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

0

आध्यात्मिक गुरु आणि ‘राष्ट्रसंत’ भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुर्योदय आश्रमात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. भय्यूजी महाराज यांना त्यांची मुलगी कुहू मुखाग्नी देणार असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले आहे.

भय्यूजी महाराज यांनी लिहिलेली सुसाईड नोट

भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी (12 जून) दुपारी इंदूर येथील राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी भय्यूजी महाराज यांना मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 50 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजी भाषेत एक सुसाईड नोट लिहिली. त्यात त्यांनी लिहिले, ‘जीवनातील तणावाला कंटाळलो आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत आहे. आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. कुणीतरी कुटुंबाची काळजी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप खचलो आहे. मी सोडून जात आहे.’

भय्यूजी महाराज यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

कोण आहेत भय्यूजी महाराज?

भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जाते. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. तसेच ते सामाजिक व राजकिय क्षेत्रातही सक्रिय आहेत. भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख आहे. इंदूरमधील बापट चौकात त्यांचे आश्रम आणि ट्रस्ट आहे. त्यांनी सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगसुद्धा केले. परंतु त्यांचा आध्यात्मिककडे कल असल्याने त्यांनी मॉडेलिंग सोडून दिले. त्यांनी काही काळ मुंबई खासगी नोकरीदेखील केली.

भय्यूजी महाराज यांची पहिल्या पत्नी मराठवाड्यातील होत्या. त्यांचे नाव माधवी निंबाळकर होते. त्यांच्या निधनानंतर त्यांनी डॉ आयुषी शर्मासोबत लग्नगाठ बांधली. पहिल्या पत्नीपासून त्यांना कुहू ही मुलगी आहे.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर भय्यूजी महाराज यांनी ग्वाल्हेर येथील डॉ. आयुषी शर्मा यांच्यासोबत विवाह केला होता.

भय्यूजी महाराज यांची अनेक राजकिय नेत्यांशी जवळचे संबंध होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सद्भावना उपवास केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींचा उपवास सोडवण्यासाठी भय्यू महाराज यांनी मध्यस्थी केली होती. देशातील दिग्गज उद्योगपती, कलाकार, राजकिय मंडळी त्यांच्या आश्रमात येत होते.

भय्यूजी महाराज यांचे शेवटचे टि्वट…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.