राज्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांना विशेष पोलिस पदक जाहीर

देशातील १२१ पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक

0

मुंबई : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी साल २०२० साठीच्या विशेष पोलिस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. विशेष पोलिस पदकासाठी देशातील १२१ पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली असून यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलिस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.
राज्यातील विशेष पोलिस पदकाचे मानकरी :१. शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर ), २. राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक, ३. उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलिस निरीक्षक, ४. नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ५. ज्योती लक्ष्मण क्षीरसागर, पोलिस अधीक्षक, ६. अनिल तुकाराम घेरडीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, ७. नारायण देवदास शिरगावकर, उपपोलिस अधीक्षक (उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती), ८. समीर नाजीर शेख, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर), ९. किसन भगवान गवळी, सहायक पोलिस आयुक्त
१०. कोंडीराम रघू पोपेरे, पोलिस निरीक्षक.न

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.