सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य धक्का, अँजिओप्लास्टी; प्रकृती धोक्याबाहेर

वुडलँड  रुग्णालयाचे एमडी आणि  सीईओ रुपाली बसू यांनी सांगितले की, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर

0

कोलकाता  :  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी हलका हृदयविकाराचा झटका आल्यामुळे कोलकाताच्या वुडलँड  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून गांगुलीची तब्येत आता धोक्याबाहेर आहे.

  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी हलका हृदयविकाराचा झटका आल्यामुळे कोलकाताच्या वुडलँड  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शनिवारी सकाळी गांगुली यांना हलका हृदयविकाराचा झटका आला. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. वुडलँड  रुग्णालयाचे एमडी आणि  सीईओ रुपाली बसू यांनी सांगितले की, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची प्राथमिक अँजिओप्लास्टी केली आहे. दरम्यान, गांगुलीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर वुडलँड रुग्णालयात पोहोचले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.