कॅन्सरवर उपचार घेऊन सोनाली बेंद्रे परतली भारतात, लिहिली भावूक पोस्ट

0

मागील काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर मायदेशी परतली आहे. सोनालीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना ही आनंदाची वार्ता सांगितली आहे. तसेच तिनो एक भावून मेसेजही पोस्ट केला आहे.

सोनालीने लिहिले, ‘दूरावा नेहमी आपल्या माणसाबद्दल प्रेम वाढवत असतो. त्यामुळे दूरावा आपल्याला खूप काही शिकवून जातो, हे नेहमी लक्षात असू द्यावा. घरापासून दूर राहून मला खूप गोष्टींची जाणीव झाली. आयुष्यात प्रत्येकजण संघर्ष करत आहे. प्रत्येकजण आपल्या परीने आयुष्य जगत आहे. संघर्ष करत असताना कुणीच हार मानत नाही.

‘आता माझे मन जिथे आहे, मी तिथे परत येत आहे. सध्या ज्या भावना आहेत त्या मी शब्दात मांडू शकत नाही. खूप लवकर मी कुटुंबीयांना भेटणार आहे.’ सोनालीच्या या पोस्टवर तिच्या अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्सने आनंद व्यक्त केला आहे.

जुलै महिन्यात सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी ती पाच महिने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती. यादरम्यान सोनालीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते.

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.