संपत्तीच्या वादातून थोरल्या मुलाने आई आणि भावाची केली हत्या

0

संपत्तीच्या वादातून थोरल्या मुलाने आई आणि धाकट्या भावाची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कराड येथील मलकापूरमध्ये घडली. जयश्री घोडके (63) आणि राजेश घोडके (40) असे मयतांची नावे आहेत. तर राकेश घोडके असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मलकापूर येथील आझाद कॉलनी येथे घोडके कुटुंब राहत होते. आरोपी राकेश आणि आई जयश्री आणि भाऊ राजेश यांच्यात संपत्तीवरून अनेकदा वाद होत होते. सोमवारी सकाळी (9 एप्रिल) दहा वाजेच्या सुमारास राकेशने आई जयश्री आणि भाऊ राजेशची गुप्तीने हत्या केली. तसेच त्याने घरात असलेल्या लोखंडी रॉड आणि बादलीनेही त्यांच्यावर वार केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन बसलेला होता. दरम्यान पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.