कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढे करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार, मग हे जिव्हारी का लागले?

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशीवरून भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण तापले

0

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशांवरून भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण चांगलेच तापले. तुम्ही चौकशा लावून सुडचक्र वापरणार असाल, तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. वेळ आल्यास आम्ही ते मागे लावू, असा इशारा भाजपला उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशांवरून भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण चांगलेच तापले. तुम्ही चौकशा लावून सुडचक्र वापरणार असाल, तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. वेळ आल्यास आम्ही ते मागे लावू, असा इशारा त्यांनी दिला.यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला धमकी देत असल्याचा आरोप केला. यावर आता शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. भाजपच्या फौजा कधी महिलांना, तर कधी पत्रकारांना पुढे करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उद्धार करता, मग हा इशारा इतका जिव्हारी का लागला? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला. भाजपची फौज कधी महिला, तर कधी पत्रकार यांना पुढे करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ एकेरी भाषेत टीका करत नाहीत, तर अगदी उद्धार करतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला, तर त्यांचे म्हणणे फडणवीस आणि भाजपच्या एवढे का जिव्हारी लागले? मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख होत असताना तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भाजप नामदार उद्धव ठाकरे यांनी धमकी दिल्याचा दावा करत आहे, पण भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काय बोलत होते? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटले. कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम-दाम-दंड भेदाची भाषा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने त्यांना उद्धव ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरेला कारे करण्याची रोखठोक मराठी पण संस्कारात्मक भाषा अशोभनीय वाटली असावी.” विरोधी पक्षनेत्यांची कीव करावी की त्यांच्या असहाय्यतेबद्दल त्यांच्यावर सहानुभूती व्यक्त करावी, असा प्रश्न पडल्याचाही नीलम गोऱ्हे यांनी भाजपला टोला लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.