…म्हणून देवेंद्र फडणवीसांना खावी लागली आईची बोलणी !

मतदारयादीत आईचे नावच नसल्याने तिची बोलणी खाऊनच मुकाट्याने घराबाहेर पडल्याची कबुली

0

पुणे  :  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार मोंदणी करण्याच्या बंधनाचा फटका माजी मुख्यमंत्री, तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींना बसला आहे.आईचे नावच मतदार यादीत आले नसल्याने नागपुरात तिची बोलणी खाऊनच मुकाट्याने घराबाहेर पडल्याची कबुली फडणवीस यांनी पुण्यातील निमंत्रितांच्या मे‌ळाव्यात दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार मोंदणी करण्याच्या बंधनाचा फटका माजी मुख्यमंत्री, तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींना बसला. आईचे नाव मतदारयादीत आले नसल्याबद्दलचा दोष फडणवीसांनी यंत्रणेला दिला असला, तरी ही यंत्रणा सरकारी की पक्षाची हे मात्र स्पष्ट केले नाही. आपटे रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील या मेळाव्यासाठी शहरातील बहुतांश शिक्षण संस्थांचे प्रमुख, पदवीधरांच्या मतदार नोंदणीमध्ये सहभाग घेतलेल्या निमंत्रितांचा समावेश होता. या वेळी फडणवीस यांनी मतदार नोंदणी ते प्रत्यक्ष मतदान याबाबतचे आपले अनुभव उपस्थितांना सांगितले. ‘आपण सुशिक्षित म्हणवतो मात्र पदवीधरच्या निवडणुकीत केवळ १४ टक्के मतदान होते. सर्वोच्च न्यायालयाने आता दर सहा वर्षांनी मतदार नोंदणी करण्याचे बंधन घातले आहे. या वेळी पहिल्यांदा अशा प्रकारची नोंदणी झाली. यंत्रणेच्या चुकीमुळे आईचे नाव मतदारयादीत आले नाही. ती १९७२पासून मतदान करत आली आहे. आता मात्र तिचे मतदार यादीत नाव नसल्याने ती चिडली होती,’ असे फडणवीस म्हणाले. ‘यापूर्वीच्या मतदार याद्या या वर्षानुवर्षे त्याच होत्या. अनेक मतदार त्यांनी प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या. आता या तक्रारींना वाव राहिलेला नाही. वर्षभरातील ही नोंदणी असून, ९९ टक्के मतदार दिलेल्या पत्त्यावरच आहेत. त्यामुळे मतदारांना भेटून विनंती करा आणि त्यांना मतदानास बाहेर काढा,’ असेही फडणवीस यांनी उपस्थितांना सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.