‘दिवाळी’या सणाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त

दीपावली हा सण आपण साजरा करतो, पण तो का?

0

      दिवाळी का साजरी करतात ? या सणाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त, दीपावली हा सण आपण  साजरा करतो, पण तो का  केला जातो? याकरिता त्याची माहिती. लक्ष्मी पूजनाचा शुभमुहूर्त कोणता जाणून  घ्या,.हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण म्हणजे दिवाळी. सण ‘धनत्रयोदशी’पासून या दीपावलीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची परंपरा आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातील पीक कापून घरात आणलेले असते. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचे पूजा केली जाते. गणरायाला नमन केले जाते. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशाने तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दिवाळी. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळी यापेक्षा आणखी कोणताही सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज, असे सणही साजरे केले जातात. कृष्णाने नरकाचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. घरातील अमंगळ जावे, अशी भावना मनोमनी बाळगून आणि घरातील धन-दौलत समृद्धी कायम राहावी, यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. बलीराजाचा नाश केल्याचे प्रतीक म्हणून बलिप्रतिपदा साजरी करतात. शटकासुराचा वध करून असंख्य भगिनींना आणि त्यांच्या भावाला सोडवल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याची प्रथा आहे. याशिवाय प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून अयोध्येला आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी केली जाते, असेही पुराणांमध्ये सांगितले जाते.दीपावलीच्या दिवशी घराबाहेर दिव्यांची आरास म्हणजेच एका ओळीत काही अंतराने दिवे लावण्याची परंपरा आहे. शेतात पिकलेले वर्षाचे धान्य यावेळी घरोघरी भरले जाते. त्यामुळे बळीराजाही आनंदात असतो. या धान्याचे पूजन करून बाजारात विक्रीसाठी आणले जाते.
कधी आहे दिवाळी :12 नोव्हेंबर – वसुबारस,
13 नोव्हेंबर- धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, यमदीपदान.,14 नोव्हेंबर- नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन- शुभमुहूर्त संध्याकाळी 5.28., 16 नोव्हेंबर – दीपावली पाडवा, भाऊबीज

अमावास्या प्रारंभ- 14 नोव्हेंबर 2020 दुपारी 2. 17 ते 15 नोव्हेंबर सकाळी 10.36 मिनिटे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.