आज दिल्लीत सुशांत सिंहप्रकरणी सिद्धार्थ पिठानीची अंतिम साक्ष

त्याने आज दिलेली साक्ष बदलता नाही येणार

0

मुंबई : सिद्धार्थ पिठानी हा सुशांत मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तो सुशांतचा मित्र होता. तो त्याच्याच सोबत रहात होता. सुशांतचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सिद्धार्थ वांद्र्यातील त्याच फ्लॅटवर होता. पण असं असताना सिद्धार्थ सातत्याने आपले जबाब बदलताना दिसतो आहे. आज मात्र त्याचा अंतिम जबाब घेण्याची वेळ सीबीआयने निश्चित केली.
काही दिवसांपासून सीबीआय इतरांचे जबाब घेतताना सिद्धार्थ पिठानी मात्र गायब झाला होता. आधी वेगवेगळ्या माध्यमातून रियाची पाठराखण करणारा सिद्धार्थ अचानक बोलायचा बंद झाला. तो मुंबईत नसल्याच्या बातम्याही आल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ दिल्लीत पोहोचला.  सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेली सीबीआयची टीम दिल्लीत पोचली. आज दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार.
सिद्धार्थ वारंवार आपला जबाब बदलतो हे लक्षात घेऊन आज शेवटची होणारी त्याची साक्ष ही कलम 164 नुसार होणार आहे. म्हणजे, आज त्याने दिलेली साक्ष बदलता येणार नाही. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत ही साक्ष लिहून घेतली जाणार आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बेडरुमचा दरवाजा उघडताना सिद्धार्थ पिठानी होता. सुशांतचा लटवकवलेल्या अवस्थेतील मृतदेह आपणच खाली काढला, असे सिद्धार्थ सांगतो. पण सहा फूट उंचीचा आणि 80 किलो वजनाचा धडधाकट शरीर एकटा माणूस खाली कसा काढेल, अशाही शंका घेतल्या जात आहेत. आता त्यात रिया आणि सुशांत भेटल्याचाही मुद्दा आला आहे. मग रिया आणि सुशांत यांच्यादरम्यान समन्वयक म्हणून कोणी काम केले तेही आता तपासून पाहिले जाणार आहे.
सिद्धार्थने आपल्या जबाबात सुशांत आपल्या रुममध्ये मध्यरात्री 1 वाजता येऊन गेल्याचे तो सांगतो. पण दुसरीकडे रियाला सोडायला सुशांत पहाटे दोन वाजता तिच्या घरासमोर असल्याचंही प्रत्यक्षदर्शी सांगतो. त्यामुळे आता सिद्धार्थ पिठानीच्या साक्षीला कमालीचं महत्वं आले आहे.
दुसरीकडे सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात तपासले गेलेले पुरावे, साक्षी आणि आलेले अहवाल पाहता, सुशांत प्रकरणाला 302 कलम लावण्याचा विचार सीबीआय करते आहे. हे कलम लागले तर गु्न्हेगारांना 302 नुसार शिक्षा होऊ शकते. आलेले फॉरेन्सिक अहवालही सुशांतचा मृत्यू होमीसाईड असू शकतो असे सांगतो. त्यामुळे त्याबाबत काय करावे याचा विचार सध्या सीबीआय करत आहे. या सर्व घडामोडींसाठी आज  4 ऑक्टोबर तारीख अत्यंत महत्वाची आहे. एकिकडे हा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. दुसरीकडे सीबीआयची टीम दिल्लीत आली आहे. तिथेही काही साक्षी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहेत. यानंतर सीबीआय या तपासातून काय उघडकीस येते ते पाहाणे कुतूहलाचे ठरणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.