सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा झाला, फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी

0

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ चांदेकर आणि ग्लॅमरस अभिनेत्री मिताली मयेकरने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दोघांनी साखरपुडा केला आहे.

त्यांचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत अगदी छोटेखाणी सोहळा पार पडला. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर या आनंदाच्या क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

मागील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर #thisisit असे लिहून त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. तसेच मितालीने ‘yes, yes, yes’ असे लिहून आनंद व्यक्त केला होता.

त्यानंतर 12 सप्टेंबरला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले, त्यानंतर सिद्धार्थने मितालीसोबतचा फोटो शेअर करून ‘तिला प्रपोज केले, तिनेही होकार दिला…’ असे म्हटले होते.

शनायासोबत होते सिद्धार्थच्या अफेअरची चर्चा…
‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील ‘शनाया’ अर्थातच रसिका आणि सिद्धार्थ हे वारंवार सोबत दिसू लागले होते. दोघे कॉफी डेट, मुव्ही डेटवर जातानाचे फोटो शेअर करत होते. परंतु काही दिवसांनंतर दोघे सोबत दिसणे कमी झाले.

मात्र आता मिताली आणि सिद्धार्थ यांनी साखरपुडा केल्याने रसिका आणि सिद्धार्थचे नाते संपुष्टात आले आहे. सिद्धार्थ आणि मितालीने मनगटावर एकत्र टॅटूही काढून घेतले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.