मुंबईमध्ये शिवसेनेच्या उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

0

मुंबईच्या मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39चे माजी उपशाखाप्रमुख होते. रात्री 8 वाजेच्या सुमारास कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली.

सचिन सावंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

याआधी अहमदनगर जिल्ह्यात पोटनिवडणूकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली होती. तसेच भिवंडी शहापूरचे तालुका उपप्रमुखांची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.