‘शिवबा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर धारदार शस्रांनी हल्ला; निर्घृणपणे खून

लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा (ता. हवेली) येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिवाजी कुमकर (वय 40) यांच्यावर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला व अपहरण करून त्यांचा निर्घृणपणे खून केला. लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी तक्रार दिली असून याबाबत लोणीकंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी दहाच्या सुमारास गोविंद कुमकर हे घरातून बाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्प्लेचे समोर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले. भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे  वातावरण आहे. घटनास्थळी उभी असलेली त्यांची होंडा सिव्हीक मोटार (क्र. एम. एच. 12जी. के. 8176), संतकृपा बिल्डींगमध्ये जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडलेले रक्त, हातावरील घड्याळ, एक चष्मा, व एक मोबाईल या साहित्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. पोलिसांनी पाच संशयितांना तपासासाठी ताब्यात घेऊन तपास पथकेही तयार केली आहेत. या हल्ल्यामागे नेमके कोण व हल्लेखोरांचा काय उद्देश होता, याचा पोलिस पथक शोध घेत आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा कुमकर यांचा मृतदेह वाडेबोल्हाई गावच्या पुढे पिंपरी सांडस परिसरात वनविभागाच्या हद्दीत आढळून आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत पडळकर हे करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.