शिवसेनेचा भगवा एकहाती फडकवण्याचे लक्ष्य, जिल्हाप्रमुखांना आदेश!

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी ऑनलाईन बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन

0

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल तीन तास चालली.

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल तीन तास चालली.दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. यंदा कोव्हिडच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले. कोव्हिडच्या काळात सरकार आपले काम करत आहे, पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केल्या. टीकाकारांना टीका करू द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा, असा सल्लाही ठाकरेंनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.