शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी; सर्व नियम पाळून होणार सोहळा

दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होणार

0

मुंबई : शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह होणार आहे. त्यामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह होणार आहे. त्यामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि मग ठीक 7.00 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून जनतेला संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसेच शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. फक्त आपल्या इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या पत्रकार बांधवांसाठी बाजूलाच म्हणजे संयुक्त महाराष्ट्र दालन येथे “पत्रकार कक्ष” उभारला आहे. पत्रकार कक्षातून प्रसारमाध्यमे ‘थेट प्रक्षेपण’ करू शकणार आहेत. छायाचित्रकारांना स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रवेशबंदी असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काहीअंशी अनलॉक केले असले तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचे व्यासपीठावरून  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केले जाईल, अशी सूचना मांडण्यात आली. तर पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधींपैकी अगदी मोजक्या व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल अशीही शक्यता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.