शिवसेनेचे लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्यावर’; मनसेचा हल्लाबोल

मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप - परिवहन मंत्री अनिल परब

0

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची यापासून ते युती आघाडी कोणासोबत करायची याबाबत उभयबाजू तयारी करत आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केले. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. मनसेला कोणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कोणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडे नागडे केले. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचे लग्न एकाशी आणि लफडे दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेने जे केले ते उघडपणे केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा हल्लाबोल देशपांडे यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.