शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात
दसरा मेळावा नेमका कसा होणार याबाबत अनेक शंका-कुशंका
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. त्यावरून अहो जनाची नाही तरी मनाची…”अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. “स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलिस कारवाईपासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतात. अहो जनाची नाही तरी मनाची…”अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. मात्र पुनश्च हरिओम म्हणते सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र तरीही सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कसा होणार, याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारले असते, त्यांनी यंदाचा दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होणार, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचे स्वरुप काय असावे? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरू होती.