पंढरपुरात शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांचे बंड; राष्ट्रवादीला मोठा धक्का

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी फडकावले बंडाचे निशाण, राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान

0

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून आज बैलगाडीतून वाजतगाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
‘शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. शैला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पहिले पाऊल टाकले आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून मी काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही मी पक्षादेश मानला होता. यंदा देखील शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. आज हलगीचा कडकडाट, महिला व मुलींची दुचाकी रॅली, पाठोपाठ सजवलेली बैलगाडी चालवत शैला गोडसे या अर्ज दाखल करायला पोचल्या. शैला यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.