भाजप-शिवसेना काँग्रेसवाल्यांचे हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला

0

लोकसभा निडणूकीची घोषणा होताच महाराष्ट्रात राजकारणात दररोज नव-नवीन घडामोडी घडत आहेत. इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळण्याचे संकेत मिळताच इतर पक्षांत प्रवेश करण्याचा करण्याचा धडाका सुरु झाला आहे. सध्या सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. परंतु भाजप-शिवसेनेने काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये असा सल्ला शिवसेनेने भाजपला ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून दिला आहे.

‘महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मुळ विचारच खरा. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये’ असा सल्लाही शिवसेनेने भाजपला दिला.

‘नरेंद्र मोदींनी कालच काँग्रेस संस्कृतीवर टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदींनी म्हटले. दुसरे असे, की काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘इनकमिंग’ आज आपल्या घरात लाभदायक वाटत असेल तरी नंतर ते तापदायक ठरू शकते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे.’ असे मतही शिवसेनेने अग्रलेखात स्पष्टपणे नमूद केले आहेत.

‘सत्ता आहे म्हणून आज लोक पक्षात येतात व सत्ता जाताच निघून जातात. आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे पाटील एकेकाळी शिवसेनेत होते आणि पितापुत्रांना एकाचवेळी केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपद फक्त शिवसेनेनेच दिले होते. पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली’ असा टोलाही शिवसेनेने राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.