करमाड येथे शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा निषेध

औरंगाबाद-जालना महामार्गावर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून आंदोलन

0

करमाड : सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे, परंतु बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला. या घटनेचा निषेधार्थ औरंगाबाद पूर्व ग्रामीण शिवसैनिकांच्या वतीने करमाड येथे शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद-जालना महामार्गावर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून आंदोलन केले.

सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे, परंतु बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला. या घटनेचा निषेधार्थ औरंगाबाद पूर्व ग्रामीण शिवसैनिकांच्या वतीने करमाड येथे रविवार दि.०९ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद-जालना महामार्गावर शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त आंदोलन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर याद राखा! कर्नाटकात येऊन मस्ती जिरवू  असा शिवसैनिकांनाचा जयघोष करत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. या ठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो” “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” ” अशा निषेधाच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. कर्नाटक सरकारकडून गेली कित्येक वर्षे सीमा भागातील मराठी माणसांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी तेथील मराठी माणसाला चांगली वागणूक द्या; अन्यथा जसाच  तसे उत्तर देण्यात येईल, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांनी इशारा दिला. यावेळी  तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे, उपतालुका प्रमुख शंकरराव ठोंबरे, नारायण मुळे, शिवाजी तोगे, विभागप्रमुख बबन वाघ, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.