शिवसेना नेते चंद्रकांत खैरे बिहार निवडणूक प्रचारासाठी रवाना

शिवसेनेच्या बिहार विधानसभा उमेदवारांचा प्रचारासाठी शिवसैनिकांची टीम रवाना

0

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमणुक केली आहे, तसेच त्यांच्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार (ता. 2) औरंगाबाद विमानतळ येथुन शिवसैनिक बिहारला रवाना झाले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, उपशहर प्रमुख किशोर कच्छवाह, नगरसेवक सचिन खैरे, यांनी शुभेच्छा दिल्या. तर दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यासाठी खैरे यांच्या सोबत उपजिल्हाप्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, विनायक उर्फ गणू पांडे, माजी नगरसेवक सतीश कटकटे यांच्यासह शिवसैनिकांची टिम रवाना झाली. ते सर्व शिवसेनेच्या विधानसभा उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.