खडसेंना प्रवेश देताना विचारात न घेतल्याने ‘हा’ आमदार नाराज

मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज

0

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद सुरु आहे तर शिवसेनेसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल, अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद सुरु आहे तर शिवसेनेसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल, अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते.  मी एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही, त्यामुळं नाराजी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. खडसे भाजपात असताना त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमच्या तोंडी फेस आणला. आमच्यावर अन्याय केला आणि आता तेच पक्षाकडून अन्याय झाल्याची भाषा करता आहेत, असेही पाटील म्हणाले. आता जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले चालले आहे. ते आता खडसे आल्यामुळं व्यवस्थित चालेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर त्यांनी खोटे गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे कटुता लगेच संपेल असे वाटत नाही. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असल्याचे पाटील म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.