प्रवीण दरेकरांबाबत झालेली ‘ती’ चूक दुरुस्त करणार! – खासदार गोपाळ शेट्टी

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी चूक झाल्याची कबुली दिली जाहीर कार्यक्रमात

0

मुंबई :  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत चूक झाल्याची जाहीर कबुली  भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे . भाजप नेते विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा उत्तर मुंबईकडून त्यांचा सत्कार झाला नाही. ही या भागाचा खासदार म्हणून माझी चूक आहे,” असे मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, “विनोद तावडे यांच्याबद्दल कुणी काय बोलले आणि माझ्याबद्दल काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. बोरिवलीत चांगलं काम केले. विनोद तावडे मंत्री झाल्यामुळे बोरिवली मतदारसंघात जास्त येत नव्हते. मात्र, बोरिवलीच्या आयुष्यात एवढा निधी पहिल्यांदाच त्यांच्यामुळे आला. एका नेतृत्वात जे काही गुण असले पाहिजे ते सर्व गुण विनोद तावडेंमध्ये आहेत. या भागाचा खासदार म्हणून मी मान्य करतो की प्रवीण दरेकर यांचा सत्कार करायचा राहून गेला आहे आणि ती माझी चूक आहे हे मी मान्य करतो. पण लवकरच आपण तो सन्मान सोहळा आयोजित करणार आहोत.”

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.