शरद पवारांची लवकरच मोठी खेळी? भाजपला बसणार धक्का

राष्ट्रवादीच्या अध्यक्षाच्या हालचालीची गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

0

गोवा : महाराष्ट्रात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता याच धर्तीवर गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खासगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशिरा दीर्घ चर्चा केली. या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असे बोलले जात आहे. सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्षाचा पाठिंबा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा जिंकून सुद्धा भाजपने गोवा फॉरवर्ड पक्ष 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, आणि 3 अपक्षांच्या साहाय्याने सरकार बनवले होते. पुढे भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना भाजपात प्रवेश केला तर 17 जागा निवडून आलेल्या काँग्रेसमधील 14 आमदार भाजपमध्ये गेले. त्याचवेळी भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष आणि दोघा अपक्षांना सत्तेच्या बाहेर काढले. सध्या भाजपच्या स्वतःच्या आमदारपेक्षा बाहेरून आलेल्या आमदारांची संख्या भाजपमध्ये जास्त असून या सर्वांची गोळाबेरीज 27 होते. यापैकी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेला मोठा ग्रुप फोडण्यात विरोधी दलाला यश आल्यास गोव्यातील राजकारणामध्ये सत्तांतर होऊ शकते.

विधानसभेतील सध्याचे बलाबल  : त्ताधारी- भाजप – 27, अपक्ष 1 = 28.

यामध्ये 28 पैकी काँग्रेसचे 13 आणि 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांनी भाजपला जवळ केले आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांची संख्या पंधरा आहे.

विरोधी पक्ष – 12  ,   काँग्रेस – 5,  मगो पक्ष – 1, गोवा फॉरवर्ड पक्ष – 3, राष्ट्रवादी -1, अपक्ष 2

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.