शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले – राजेश टोपे

पार्थ पवार प्रकरणाला वेगळे वळण देण्याची गरज नाही!

0

जालना : पवारांचे घराणे हे राज्यातील आदर्श घराणे आहे. पार्थ पवार प्रकरणाला मीडियाने वेगळे वळण देण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते पार्थ पवार यांना जे काही बोलले ते अधिकाराने बोलले आहेत. त्यामुळे पार्थ पवार प्रकरणाला वेगळे वळण देण्याची गरज नाही, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. त्यांनी सांगितले की, आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठीक असून हे सरकार पाच वर्षे चालेल, असा दावाही केला. कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली, याबाबत प्रश्न विचारला असता, चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या गैरव्यवहाराचे पुरावे द्यावे त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही टोपे म्हणाले. खासगी डॉक्टरांनी सेवेसाठी पुढे यावे; अन्यथा मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई केल्या जाईल. याशिवाय बॉम्बे नर्सिंग कलमानुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे जनहितासाठी हे करावेच लागेल, असा इशारा देखील टोपे यांनी खासगी डॉक्टरांना दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.