शहीद संग्राम पाटील अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शासनाकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत : पालकमंत्री सतेज पाटील

0

कोल्हापूर  : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर गेल्या सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांनाही काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले.

या दोन वीर पुत्रांना गमावण्याची वेळ कोल्हापूर जिल्ह्यावर ओढावली. करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले. शोकाकुल वातावरणात शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावरआज (सोमवारी) त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वात आधी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते वीर जवान संग्राम पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्य सरकार दोन्ही वीरमरण आलेल्यांना प्रत्येकी एक कोटी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. वीर जवान अमर रहे…च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात होत्या. संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.