शनिवारपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, हवामान खात्याचा इशारा

शुक्रवारी सकाळी अनेक जिल्ह्यांत पावसाची विश्रांती तरी आजही मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई  : बंगालच्या उपसागराच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांसह महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी घरांत, रुग्णालयांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी सकाळी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तर आजही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या बदलांचा परिणाम पुढचे दोन दिवस असणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर, कोकण आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या अनेक घाटमाथा असलेल्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी मुसळधार धारा कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी मोठ्या वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.