शोपियान भागात सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांना धाडले यमसदनी
शोपियानच्या सुगन भागात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत चकमक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली. यावेळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्याच्या सगुन परिसरात सुरक्षादलाने बुधवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एन्काउंटर मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि बुधवारी सकाळी जवळपास 11.30 वाजता संपले. दहशतवादी लपलेले असल्याची सूचना मिळाल्यानंतर सिक्योरिटी फोर्सेजने सर्च ऑपरेशन सुरू केले होते. पोलिसांनी दहशतवाद्यांना सरेंडर करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी फायरिंग सुरू केली होती.सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सूचनेच्या आधारे सुगन भागात सकाळी शोधमोहीम राबवली. त्यामध्ये त्यांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलिस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.