‘एसईबीसी’ आणि ‘ओबीसी’ एकच, भाजपने घातला घोळ

'एसईबीसी' चा लाँग फॉर्म कधी दिला नाही, मराठ्यांना आम्ही ती देतो म्हणजे काहीतरी वेगळे ....

0

मुंबई : फक्त मराठा समाज ‘एसईबीसी’ नाही, तर आम्हीसुद्धा ‘एसईबीसी’ आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे ‘एसईबीसी’ आहेत, असे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत. मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसेही आम्ही ‘एसईबीसी’होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर केला आहे.

‘एसईबीसी’ चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही ‘एसईबीसी’ देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षणाच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे. आरक्षण हे लोकसंख्येनुसार सगळ्यांना देता येईल. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असल्यास लोकसंख्येची गणना करावी लागेल, आपल्याला 2021च्या लोकसंख्येच्या गणनेची वाट बघायची गरज नाही. आपण आठ दिवसांतही लोकसंख्येची गणना करू शकतो, असंही हरिभाऊ राठोड यांनी अधोरेखित केले आहे.  फक्त मराठा समाज ‘एसईबीसी’नाही, तर आम्हीसुद्धा ‘एसईबीसी’ आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे ‘एसईबीसी’आहेत. मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसेही आम्ही ‘एसईबीसी’ होतो आणि आताही आहे, ‘एसईबीसी’ चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही ‘एसईबीसी’ देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. ‘एसईबीसी’ आणि ओबीसी एकच असल्याचे आम्ही सांगितले आहे. मराठा समाजानं सर्वोच्च न्यायालयाच्या मागे लागू नये. फार तिथून काही मिळेल असे वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकारच हे आरक्षण देऊ शकते. आपल्या अधिकारात आहे. नितीश कुमारांनी जो मुद्दा मांडला आहे, तोच माझाही मुद्दा असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर थेट लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रत्येक जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं, अशी आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या या मागणीला मतदार किती प्रतिसाद देतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल. जातीनिहाय जनगणना करणं हे आपल्या हातात नाही. मात्र, जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं ही आपली मागणी असून त्यात कोणतंही दुमत नाही, असं नितीशकुमार म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.