औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, मात्र पालकांची परवानगी आवश्यक

राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, मात्र मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार

0

औरंगाबाद : महाराष्ट्रात इयत्ता नववी ते अकरावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपवला होता.

राज्य सरकारच्या आदेशाची औरंगाबादेत अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे

…तर शाळा पुन्हा बंद करण्यात येतील

ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आणि इतर तांत्रिक भेडसावत असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण देण्यात अडचण येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकही कंटेन्मेंट झोन नसल्यामुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम आणि सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. एखाद्या शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यास त्या शाळा काही काळासाठी पुन्हा बंद करण्यात येतील असेही ते म्हणाले. गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. यापुढेही शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी राहणार नाही अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यात 1176 शाळा असून 11,648 शिक्षक आहेत. शासन आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत साडे चार हजार शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात 9 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. औरंगाबाद शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची संख्या मोठी नाही. यामुळे आम्ही शिक्षकांच्या चाचण्या घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत, असे चव्हाण म्हणाले.

शाळा सुरू करण्याबाबत सूचना

> शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण > स्वच्छतेच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करू नये > शाळेत हँडवॉश, सॅनिटायझर, साबण, पाण्याची व्यवस्था > विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी > बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश > सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एचआरसीटी तपासणी > शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.