वाळूज महानगर भागात नववी ते बारावीपर्यत शाळा सुरू
शाऴेकडून काेराेनासंदर्भात विद्यार्थ्यांची घेतली जाते खबरदारी
औरंगाबाद : शासनाकडून नववी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर वाळूज महानगरातील शाळा सुरु झाल्याचे दिसले. शाळेतील नववी ते बारावी पर्यतच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र पालकांनी दिले त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. जवळ जवळ आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी शाळेत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हाेता. परंतू शाळेत आलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचेही निदर्शनास आले.
शासनाकडून नववी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णयानंतर वाळूज महानगरातील शाळा सुरु झाल्याचे दिसले. शाळेतील नववी ते बारावी पर्यतच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र पालकांनी दिले त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. जवळ जवळ आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी शाळेत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हाेता.काेराेनाला आळा घालन्याकरिता शासनाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शाळा बंदचा निर्णयदेखील शासनाने घेतला होता. त्यामुळे जवळजवळ आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थांचे शिक्षण सुरु हाेते. परंतू ऑनलाइन शिक्षणातही शिकवतांना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे शिक्षकांकडून व बाेलले जात हाेते. त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्यात ,असे अनेकांना वाटत हाेते. शासनाकडून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत शिक्षकांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून होत आहे. वाळूज महानगरातील शाळेत काेराेनाला आळा घालण्यासाठी लागणारी खबरदारी घेण्यात आली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या मुलांना मास्क लावल्यानंतरच प्रवेश दिला. तर विद्यार्थ्यांचे मशिनच्या साहाय्याने तापमान तपाासूनच हातावर सँनिटाईजर टाकण्यात आले हाेते. तसेच शाळेचे वर्ग सँनिटाईजरची फवारणी करून सुरक्षित करण्यात आले होते. पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी हाेते.