‘सतीश चव्हाणांनी पदवीधरांचा केला बट्ट्याबोळ, बोराळकर हेही त्यांचीच बी टीम’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता सेलचे प्रदेश सचिव प्रा. विजय सुरासे यांचा त्यांना घरचा आहेर

0

जालना : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे वाटोळं केलं आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर हे सतीश चव्हाण यांचीच ‘बी’ टीम असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता सेलचे प्रदेश सचिव प्रा. विजय सुरासे यांनी करत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

सतीश चव्हाण यांनी पदवीधर, विनाअनुदानित शिक्षक, बेरोजगार यांच्यासाठी 12 वर्षांत केलेली किमान 12 कामे तरी दाखवावी, असे आव्हान प्रा. विजय सुरासे यांनी दिले आहे. प्रा.विजय सुरासे यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रा. सुरासे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शिक्षण संस्थेवरील शिक्षकपदाच्या नोकरीचा राजीनामा देऊन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आमदार सतीश चव्हाण आता पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा उतरले आहेत. या निवडणुकीची त्यांनी तब्बल वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी 12 वर्षांत तळागाळात पाळेमुळे रुजवली होती. त्यामुळे औरंगाबादसह जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहेत. त्याचबरोवर सतीश चव्हाण यांचा जनसंपर्कदेखील दांडगा आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचं पारडे जड असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे, सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजपचे मोठं आव्हान असणार आहे. भाजप नेते विक्रम काळे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना वडील वसंतराव काळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाल्याची आठवण करून दिली. त्यामुळे विजय आपलाच आहे, अशा भ्रमात महाविकास आघाडीने राहू नये, असं विक्रम काळे यांनी सांगितले. दरम्यान, बिहार, मध्यप्रदेशात कमळाचे पीक जोरात आले आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.