भारताची सुवर्णभरारी, सतीश शिवलिंगमने पटकावले सुवर्णपदक

0

भारताने 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिस-या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात भारताचा वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने हे सुवर्णपदक पटकावले आहे.

सतीशने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलून गोल्ड मेडल मिळवले आहे. त्याने स्नॅचमध्ये 144 तर क्लीन अँड जॅकमध्ये 173 किलोग्रॅम वजन उचलले. भारताने आतापर्यंत 3 सुवर्णपद मिळवले आहे. तसे पाहता भारताने आतापर्यंत पाच पदकांची कमाई केली आहे.

मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थमध्ये सतीशने 320 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले होते. तसेच त्याने 2014मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी त्याने स्नॅचमध्ये 149 किलो वजन उचलून कॉमनवेल्थ गेममध्ये विक्रम रचला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.