पहिला पारधी समाजातील संताजी पवार यांना सांजा गावच्या सरपंच पदाचा मान

संताजी पवार शिवसेनेते कार्यकर्ते असून ते महाविकास आघाडीचे सरपंच

0

उस्मानाबाद :राज्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असल्या तरी अजूनही सरपंच पदासाठीची रस्सीखेच सुरुच आहे. आज (22 जानेवारी) उस्मानाबाद जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. उस्मानाबाद शहराच्या शेजारील सांजा या गावचा सरपंच होण्याचा मान पारधी समाजातील संताजी पवार यांना मिळाला.

संताजी पवार शिवसेनेते कार्यकर्ते असून ते महाविकास आघाडीचे सरपंच असणार आहेत. सांजा या गावातील 15 पैकी 12 जागा महाविकास आघाडीच्या जोगेश्वरी विकास पॅनेलला मिळाल्या होत्या. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर संताजी पवार यांच्या वाट्याला हे पद आले. 7 वी पास असलेले संताजी पवार अगोदर शेतात काम करत होते. त्यानंतर त्यांनी मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. यंदा पहिल्यांदाच त्यांनी गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयीही झाले. विशेष म्हणजे आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदाचाही मान त्यांनाच मिळाला.संताजी पवार यांनी शेतकरी, मजूर ते थेट गावाचा सरपंच असा प्रवास केला. हा प्रवास सशक्त लोकशाहीमुळे पूर्णत्वास गेल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. उस्मानाबाद नगर परिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद ऊर्फ नंदू राजे निंबाळकर यांनी नूतन सरपंच पवार यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.भविष्यात वीज, पाणी, रस्ते, नालीकामे करण्याचा पवार यांचा मानस आहे. स्वार्थासाठी काही न करता गावाची विकासकामे करणार, असा त्यांचा संकल्प आहे. गावात मतभेद न करता एकत्र येऊन विकासावर भर देण्याचा संकल्प त्यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.