संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही दुश्मन नाही : चंद्रकांत पाटील

...घरातील काही जणांना नाराज करावे लागते, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

0

औरंगाबादः तीन तीन महिन्यांचा तर आमदार करता येत नाही, घरात काही जणांना नाराज करावे लागते, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा त्यावर भाष्य केले.

तीन तीन महिन्यांचा तर आमदार करता येत नाही, त्यासाठी घरात काही जणांना नाराज करावे लागते, एकाला न्याय तर बाकीच्यांवर अन्याय असे होतच असते. संग्राम देशमुख हा काही माझा जावई नाही, मेधा काही दुश्मन नाही, असेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही मेधा कुलकर्णी यांनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. भाजपकडून मला हल्ली बैठका आणि आंदोलनासाठी निरोप दिले जात नसल्याचे सांगत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली होती. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात, त्याचाही निरोप दिला जात नाही, आजच्या आंदोलनाचाही मला निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. यानंतर भाजपकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अगदी त्या  मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत होत्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.