मुच्छड पानवालाचे नाव समोर आल्यावर ‘एनसीबी’कडून समीर खान यांना अटक

नार्कोटिक्स पथकाने गुरुवारी सकाळी समीर खान यांच्या घरावर टाकली धाड, पुराव्यांची शोधाशोध सुरू

0

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून या ठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले. यामध्ये नवाब मलिक यांनी म्हटले की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचे काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हणाले. शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे 200 किलो परदेशी गांजा जप्त केला. करणच्या खात्यावर समीर खान यांच्याकडून ऑनलाइन 20 हजार रुपये पाठविले होते. त्यामुळे खार परिसरात राहत असलेल्या समीर खान यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्याअनुषंगाने बेलार्ड पियार्ड येथील एनसीबीच्या कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याला पैसे दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. मात्र त्याबाबतचा सबळ पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुमारे 8 वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अमली पदार्थप्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावेदेखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर, अशी ओळख असणाऱ्या करण सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करण सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावे समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचे नाव समोर आले आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.