शिवसेनेचा ‘संभाजीनगर’ हा अस्मितेचा विषय, खोटे बोलण्यात भाजपचा हातखंडा- अंबादास दानवे

मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय

0

औरंगाबाद : संभाजीनगर हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय असून, शहराच्या नामकरणासाठी पाठपुरावा सुरूच राहील. दुसरीकडे शहराचा विकासही गतीने होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना फायदा करून देण्यासाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात मदत केंद्र सुरू करणार असल्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, गुंठेवारी अधिनियमाची मुदत वाढवण्यासोबत घाटी रुग्णालयातील 350 पदे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासून हे दोन्ही विषय प्रलंबिक होते. गुंठेवारी भागातील 2015 पर्यंतची बांधकामे नियमित करण्याची मागणी महापालिकेने केली होती. पण शासनाने 2020 पर्यंत मुदत वाढविली आहे. गुंठेवारी अधिनियमानुसार मालमत्ता नियमित करण्यासाठी काय कागदपत्रे लागतील, नोंदणी कशी करावी लागेल? यांसह इतर माहिती देण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रत्येक वॉर्डात मदत केंद्रे सुरू केले जातील. गुंठेवारी नियमितीकरणानंतर पीआर कार्डचा विषयही मार्गी लागेल. महापालिका निवडणुकीमुळे संभाजीनगर, गुंठेवारीसारखे भावनिक विषय शिवसेना समोर आहेत का? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले की, संभाजीनगर हा विषय आमच्या अस्मितेचा आहे. भावनिक मुद्यासोबतच शहराचा झपाच्याने विकास सुरू असल्याचे दानवे यांनी नमुद केले. यावेळी संतोष जेजूरकर, राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी, संतोष खेंडके उपस्थित होते.
शिवसेनेमुळे गुंठेवारी भागाचा विकास
जुन्या शहरातील दंगलीने त्रस्त झालेले नागरिक स्थलांतरित झाले व गुंठेवारी वसाहती निर्माण झाल्या. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने या भागात विकासकामे झाली. या भागात तुरळक वसाहती होत्या. त्यावेळी शिवसेनेने संरक्षण दिले. शिवसेनेचे शाखाप्रमुख पुंडलिकराव राऊत चोरट्यांशी दोन हात करताना मृत्यूमुखी पडले. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांनी त्यावेळी त्या भागाचे पुंडलिकनगर, असे नामकरण केल्याचे दानवे म्हणाले.
भाजपने सत्ता असताना केले काय ?
संबाजीनगर असे नामकरण करण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत होती. गुंठेवारीची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावावर भाजप नगरसेवकांनीदेखील सह्या केल्या आहेत, असे भाजपतर्फे सांगितले जात आहे. गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी हे विषय का मार्गी लागले नाहीत? खोटे बोलण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही, असा टोला लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.