समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन

वयाच्या 92 व्या लर्षी त्यांनी औरय्यामधील कढोरचा पुरवा येथे घेतला अखेरचा श्वास

0

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते यांचे निधन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या लर्षी त्यांनी औरय्यामधील कढोरचा पुरवा येथे अखेरचा श्वास घेतला.

मुलायमसिंह हे तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. तसेच दोन वेळा औरय्याच्या विकासखंड भाग्यनगरचे तालुकाध्यक्ष देखील होते. मुलायमसिंह यादव हे समाजवादी पार्टीचे संस्थापक आमि उत्तरप्रदेशचे माजी मुखयमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय होते. 1949 मध्ये ते पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते कायम राजकारणात सक्रिय राहिले. पण गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून लांब राहिले होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले, आपण मुलायमसिंह यादव यांनी नेहमीच शेतकरी, गरीब आणि असह्य नागरिकांसाठी आपला आवाज उठवला. त्यांचे शहरात कोणतेही घर नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावात अगदी साधेपणाने घालवले, असे अखिलेश यादव म्हणाले.
अखिलेश यांनी मुलायमसिंह यादव हे आयुष्यभर समाजवादी विचारधारेप्रति समर्पित राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी मुलायमसिंह आजारी होते कानपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोक पसरला. मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरापुढे कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी झाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.